
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीतील पाच पैकी तीन जागांवर महायुतीचा पराभव झाला. या पराभवानंतर महायुतीमधील अंतर्गत वादाचे फटाके फुटू लागले आहेत. भाजपने पराभवासाठी शिवसेना शिंदे गटावर बोट दाखवले आहे. शिंदे गटाने महायुतीचा धर्म न पाळल्यानेच हा पराभव झाल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे आता शिंदे गटाच्या आमदाराने मोठी खळबळजनक कबुली दिली आहे.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे सिल्लोडचे आमदार आणि नेते अब्दुल सत्तार यांनी अत्यंत खळबळजनक कबुली दिल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपण महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विरोधात थेट काम केल्याचे उघडपणे मान्य केले. “माझा महाविकास आघाडीच्या विजयात खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून काहीही केले नाही, मी पहिल्यापासून सांगत होतो की मी सतीश चव्हाण यांना मतदान करणार नाही,” असे विधान करत सत्तार यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
