
विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर पक्षातील नेत्यांकडूनच नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आत्मचिंतनाचा सल्ला दिल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांचीच री ओढत पक्षाला खरोखर चिंतनाची गरज असून लोक आपल्यापासून दूर का जात आहेत, हे शोधले पाहिजे, असे विधान केले. त्यांच्या वक्तव्यातून पक्षाविषयीची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. राष्ट्रवादीतील दोन वरिष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे टीकेचा रोख ठेवल्याने ही नाराजी नेमकी कशामुळे आहे? नेतृत्वावरून अंतर्गत धुसफूस आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्याविरोधात दोन हात केले. परंतु शिवसेना शिंदे गटाने उघडपणे शरदचंद्र पवार पक्षाचे काम केले. त्यामुळे सतीश चव्हाण यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या सतीश चव्हाण यांना धक्का बसला. वर्षांनुवर्षे जिंकत असलेली जागा हरल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नेतृ्त्वाकडे बोट दाखवून लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी जनमाणसांत पुन्हा गेले पाहिजे, असे ठासून सांगितले.
