• Home
  • राजकारण
  • लाडकी बहीण योजनेवर आधारित चित्रपटात गौतमी पाटील झळकणार 
Image

लाडकी बहीण योजनेवर आधारित चित्रपटात गौतमी पाटील झळकणार 

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. आता या योजनेवर आधारित चित्रपटात  प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या अभिनयाच्या जोडीला रात्रीस खेळ चाले फेम लोकप्रिय अभिनेते अण्णा नाईक यांची दमदार साथ असणार आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. नुकताच सातारा येथे या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला.

गणेश शिंदे करणार चित्रपटाचे दिग्दर्शन 

मराठी चित्रपटसृष्टीतून समाजाभिमुख विषयांना चालना देणाऱ्या सिनेमांची परंपरा आहे.अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेला ‘लाडकी बहीण’ हा एक चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर  दिग्दर्शनाची जबाबदारी गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाचे काम शितल शिंदे यांनी साकारले आहे

या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top