16 वर्षांच्या मुलीबरोबर लग्न करून केला अत्याचार; तरुणावर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – १६ वर्षांच्या मुलीसमवेत अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही लग्न करुन तिच्यावर अत्याचार करुन गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नागेश दशरथ लांडगे (वय २५, रा. साठेनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागेश लांडगे याने एका १६ वर्षांच्या युवतीबरोबर लग्नापूर्वी तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याबरोबर लग्न केले. तिच्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती केले.

हा प्रकार फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत पिडिताच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घडला. याप्रकरणी सहायक फौजदार मुनीर अब्बाज इनामदार यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.