Pune : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माहेरी आलेल्या पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याच्या रागातून चाकून वार करून तिचा खून केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पतीला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीमध्य ठेवण्याचा आदेश दिला.

सागर लोखंडे (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याने त्याची पत्नी शुभांगी हिचा खून केला आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सात एप्रिल रोजी भेकराईनगर येथील फुरसूंगी परिसरात ही घटना घडली. तब्येत ठिक नसल्याने शुभांगी या आठ दिवसांपुर्वी माहेरी निघून आल्या होत्या. त्यानंतर सागर हा त्यांना घेण्यासाठी घरी आला असता त्यांनी त्याच्यासोबत जाण्यास नकरा दिला. याच रागातून सागर याने त्यांना चाकूने वार करून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.