अहमदनगर : पेपरमिलच्या हौदात पडून 2 मजुरांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पेपरमिलचा कागदी लगदा तयार करणाऱ्या हौदात बुडून दोघा मजुरांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर औद्योगिक वसाहातीत बुधवारी (दि. 7) ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कामगारवर्गांसह दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मनोजसिंग दयाशंकर सिंग (वय 35.) आणि प्रशांत विरेश भुतळे (वय 16 दोघेही रा. धनगरवाडी) असे मृत मजुरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत हा आपल्या आईसोबत पेपरमिल परिसरात राहत होता. बुधवारी सांयकाळी त्याची आई शेतमजुरीचे काम आटोपून घरी परतली. त्यावेळी प्रशांत हा घरात नसल्याने आईने त्याचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, एमआयडीसी परिसरात रात्रीच्या सुमारास एका पेपरमिलच्या कागदी लगदा तयार केल्या जाणाऱ्या हौदात प्रशांत व मनोजसिंगचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे दोन्ही कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैद्यकीय अहवालानुसार तालुका पोलिसांनी आकस्मात मुत्यूची नोंद केली. मृतदेहाच्या उत्तरणीय तपासणीनंतर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.