8 एप्रिल राशीफळ : कुणाला मिळेल खुशखबरी, तर कुणाच्या हाती येईल निराशा, इतरांसाठी असा आहे गुरूवात

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसायाचे निर्णय घेताना वैचारिक स्पष्टता ठेवा, ज्यामुळे भविष्यात चांगला लाभ होईल. संततीच्या भविष्याबाबत आज एखादा निर्णय घ्याल, ज्यामध्ये वडीलांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो, यासाठी सतर्क राहा. आई-वडीलांची सेवा करण्याची संधी मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळी थोडा थकवा जाणवेल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात सतर्क राहावे लागेल कारण चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही नवीन करण्याचा विचार कराल, ज्यामध्ये वडीलांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. मामाच्या बाजून धनलाभ होईल. जर कोर्ट, कचेरीचे एखादे प्रकरण सुरू असेल तर त्यामध्ये दिलासा मिळेल. रोजगाराशी संबंधीत जातकांना एखादी शुभ माहिती मिळू शकते. सायंकाळी भावांसोबत काही विशेष मुद्द्यावर चर्चा कराल.

मिथुन
आजचा दिवस थोडा निराशाजनक आहे. व्यवसायात जी आशा होती ती पूर्ण न झाल्याने हताश होऊ शकता. वैयक्तिक संबंधात काही मतभेदांचा सामना करावा लागू शकतो, परंतु जीवनातील कठिण अनुभवांतूनच धडा घेऊन पुढे जावे लागेल आणि मेहनत करावी लागेल. ज्यामुळे तुम्ही यशाची शिडी चढाल. सासरच्या बाजुच्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. सायंकाळचा वेळ कुटुंबातील छोट्या सदस्यांसोबत घालवाल.

कर्क
आजच्या दिवशी खुप ऊर्जा जाणवेल. कार्यक्षेत्रात सुद्धा तरूणांना प्रोत्साहित करण्याचा विचार कराल आणि त्यामध्ये यश मिळेल. काही शारीरीक त्रास असेल तर तो वाढू शकतो. आज एखादा निर्णय घ्यावा लागला तर विचारपूर्वक घ्या, तरच तो पूर्ण होईल. संतती पुण्य कार्य करेल, त्यामुळे गर्व वाटेल. राजकीय क्षेत्रात सुद्धा मोठे व्हाल. सासरच्या बाजूने मान सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काही पुस्तकांची आवश्यकता असेल.

सिंह
वैयक्तिक संबंध प्रेमाने पार पाडाल. व्यवसायात खुप लाभ होईल, ज्यामुळे मनासारखी खरेदी कराल आणि मन शांत राहिल. कौटुंबिक नाती चांगल्या प्रकार जपाल. मुले आणि कुटुंबातील सर्व सदस्य आज काही मागणी करतील, जी तुम्ही आनंदाने पूर्ण कराल. आळस सोडून पुढे जावे लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण करावी लागतील. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसाबत एखाद्या तिर्थस्थळाचा प्रवास करू शकता.

कन्या
आज व्यवसायात तेजीमुळे चांगला बदल होईल. नवनवीन योजना बनवाल, ज्यामुळे यशाची पायरी चढाल, परंतु निर्णय घेताना मनाचे ऐका आणि दुसर्‍यांच्या काही चुका माफ कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. संततीला एखाद्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन द्याल. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसायासाठी उपयोगी ठरेल.

तुळ
आजचा दिवस संमिश्र आहे. एक नवा काळ सुरू होणार आहे, ज्यामध्ये व्यवस्था आणि योजना पूर्ण कराल. हलका तणाव जाणवेल. व्यवस्थेच्या नव्या संधीसाठी तयार राहावे लागेल. अनेक शक्यता आहेत, ज्या शोधाव्या लागतील. नोकरीत अजातशत्रु कामाचा भार वाढवू शकतात. परंतु अस्वस्थ होऊ नका. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीने तो कमी होईल. सीझनल आजार त्रास देऊ शकतात, सावध राहा.

वृश्चिक
आजचा दिवस काही परिणाम घेऊन येईल. देखाव्याच्या जीवनात सुधारणा करावी लागेल, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडवू शकता. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रकरणात आणखी उर्जावान होऊन धाडस दाखवावे लागेल आणि अशक्य गोष्टी करून दाखवाव्या लागतील. प्रेमसंबंध सुखमय राहतील, ज्यामुळे मूड चांगला राहिल. संततीचे आरोग्य थोडे बिघडू शकते, यासाठी बाहेरचे खाणे टाळा.

धनु
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, तरच यश मिळेल. एखादा मित्र बिझनेससाठी नवीन डिल फायनल करू शकतो, जी आर्थिक स्थितीसाठी लाभदायक असेल. सायंकाळी आईच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, यासाठी सतर्क राहा. कुणाशीही वाद-विवाद करू नका, अन्यथा तो कायदेशीर होऊ शकतो.

मकर
आजचा दिवस गोंधळाची स्थिती निर्माण करू शकतो. मात्र, सायंकाळ होताच काही सुधारणा होईल, परंतु एकदाच संपणार नाही. कार्यक्षेत्रात जुन्या पद्धती आणि कल्पनांमध्ये सुधारणा केली तर लाभ होईल. नोकरीत कुणाला काही बोलण्याच्या अगोदर विचार करावा लागेल, जेणेकरून समोरच्याला तुमचे बोलणे वाईट वाटणार नाही. वैयक्तिक संबंधात भावना प्रखर राहतील. नोकरीत एखाद्या अधिकार्‍याच्या मदतीने खुशखबर मिळू शकते.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. भूतकाळ आणि भविष्यातील योजनांमध्ये पडू नका, त्याऐवजी वर्तमानात जीवन जगा, जर हाच विचार करत बसला तर हातातून सुवर्णसंधी घालवाल. नोकरीसाठी जातकांना प्रमोशन मिळू शकते, परंतु शत्रु काही अडचणी निर्माण करतील, तरीसुद्धा यश मिळेल. कार्यक्षेत्रात एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. व्यवसायात एखादे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची आशा आहे, तुमच्या आर्थिक स्थितीला भविष्यासाठी मजबूत करेल. संतती बिझनेसमध्ये मदत करेल, ज्यामुळे आनंद होईल. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. कार्यक्षेत्रात चर्चेतून प्रत्येक समस्येवर मार्ग काढण्यात यशस्वी ठराल. कुटुंबात जर एखादा वाद झाला तर, वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नात्यात कटुता येऊ शकते. वैयक्तिक प्रकरणात रचनात्मक मार्ग काढाल. व्यापारासाठी एखादा प्रवास करू शकता, जो लाभदायक ठरेल.